शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची लागणार मंत्री पदी वर्णी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित मंत्री मंडळ विस्तार उद्या रविवारी सकाळी ११ वाजता राज भवनाच्या गार्डनवर पार पडणार आहे. या मंत्री मंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे असणारे तानाजी सावंत यांची मंत्री पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तानाजी सावंत सध्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार आहेत.

भैरवनाथ शुगर सोनारी या साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठे संघटन उभ करून तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा कर्मयोग पाहून उद्धव ठाकरे यांनी त्यांना यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेची जबाबदारी दिली. त्यानंतर आता त्यांचे नाव मंत्री पदासाठी चर्चेत आहे. त्याच प्रमाणे विजयसिंह मोहिते पाटील यांचे देखील नाव मंत्री पदासाठी पुन्हा चर्चेत आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील या दोन नेत्यांची मंत्री मंडळात वर्णी लागल्यास सोलापूर जिल्हयाचे ४ नेते मंत्री मंडळात असणार आहेत.

उद्या सकाळी ११ वाजता पार पडणाऱ्या शपथ विधी सोहळ्यात आशिष शेलार, औरंगाबादचे आमदार अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर, संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे या नेत्यांचा मंत्री म्हणून समावेश होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment