भाजप महाप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे युतीबद्दल मोठे वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राष्टवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना आज भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अकोल्याचे आमदार वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार संदीप नाईक , आमदार कालीदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीवर मोठे विधान केले आहे.

IPS साहेबराव पाटील यांचा भाजप प्रवेश ; मिळू शकते विधानसभेची उमेदवारी

आगामी विधानसभा निवडणूक आम्ही युतीच्या माध्यमातून लढणार आहे. येणारे सरकार आमचेच असणार आहे. मात्र आम्ही सत्ता संपादनाचा कोणता नवा विक्रम प्रस्तापित करणार हे बघण्यासारखे राहणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस म्हणाले आहेत. त्यांच्या याविधानाने शिवसेना-भाजप युती तोडून निवडणूक लढणार या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात

मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले की , शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात असणारी युती हि अभेद्य आहे. त्यामुळे आम्ही युतीतच निवडणुका लढणार आहे. जागांवरून वाद आहेत. त्यामुळे वेगळे लढायचे आहे. शिवसेना वेगळी लढेल. भाजप वेगळे लढेल हे आता मुद्देच असणार नाहीत. मात्र आम्ही काही जागांची अदला बदल नक्की करणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

म्हणून केला नाही गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश

भाजपचा महाप्रवेश सोहळा संपन्न ; शिवेंद्रराजेंसह इतर आमदारांचा भाजप प्रवेश

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पराभव करण्याला राधाकृष्णांच्या पत्नीला पाहिजे संगमनेरची उमेदवारी

गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट लावली : जितेंद्र आव्हाड

Leave a Comment