राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा भाजप प्रवेश होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप येत्या ३० जुलैला सर्वच विरोधी पक्षाला जोराचा धक्का देत जोरदार इनकमिंग करणार आहे यात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले देखील भाजपमध्ये सामील होणार आहेत असे वृत्त समोर आले आहे.

गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मुलाखतीला दांडी मारून शिवेंद्रराजेंनी हॉटेलमध्ये जाणे पसंत केले. त्यांनी कारण काहीही दिले तरी राष्ट्रवादीला आता ते रामराम करणार हे निश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भाजपमध्ये जाण्याचे वृत्त नाकारून त्यांनी राष्ट्रवादीला दोन वेळा वेगवेगळ्या सभांमध्ये इशारा दिला होता. मात्र राष्ट्रवादीत आपले भविष्य अंधकारमय आहे असा समज राजांचा झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत वैभव पिचड, चित्रा वाघ आणि मधुकर पिचड हे देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता ३० तारखेची सर्वच राजकीय जाणकारांना आतुरता आहे.

महत्वाच्या बातम्या 

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपमध्ये करणार प्रवेश

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

बागलांचा जीव भांड्यात ; संजय शिंदे करमाळा विधानसभेसाठी इच्छुक नाहीत

Leave a Comment