अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्या एकाच बॅनरवर शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा प्रकार माध्यमांच्या चर्चेचा विषय झाला आहे. शुभेच्छा दिल्या आहेत सातारचे लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात उभा असणारे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी. या बॅनरवर दोन पक्षाचे नेते एक करण्याची किमयाच नरेंद्र पाटलांनी करून दाखवली आहे.

अजित पवार यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिवस एकाच दिवशी येत असल्याने वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न नरेंद्र पाटील यांनी केला आहे. पवारांचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील हे देखील या बॅनरवर आहेत. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी आणि शरद पवार देखील या बॅनरवर बघायला मिळाले आहेत. नरेंद्र पाटील यांनी त्यांचे वडील अण्णासाहेब [पाटील यांचा देखील फोटो या बॅनरवर छापला आहे.

विधानसभेचे वातावरण तापू लागले असता नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. माथाडी कामगार संघटनेच्या मथळ्याखाली या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. माथाडी कामगार संघटनेचे नरेंद्र पाटील हे अध्यक्ष आहेत.

Leave a Comment