एमआयएम आमदार वारिस पठाण पोलिसांच्या ताब्यात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | एकीकडे देशभरात काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर देशभरात त्याचे स्वागत करण्यात आले आहे तर काश्मीरात तणावपूर्ण शांतता आहे. मुंबईत शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी काश्मीरी जनतेसाठी विशेष प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप आमदार पठाण यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे आले आमने सामने

नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही वारीस पठाण यांनी दिली असल्याने त्यांच्या विधानात सत्यता असल्याचे वाटते. या प्रार्थनेसाठी त्यांनी परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान इतर काही लोकांना ताब्यात घेतले असून वारिस पठाण यांना ताब्यात घेतले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. आमदार पठाण यांना त्या जागेवरून दूर होण्यास सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबई मनपाच्या ५८ हजार कोटीच्या फिक्स ठेवी तरी देखील मुंबई पाण्यात बुडते ; गडकरींचा शिवसेनेला घरचा आहेर

‘एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्रदिनाचा सोहळा साजरा करत असताना काश्मिरातील जनतेला मात्र प्राण्यांसारखे पिंजऱ्यात बंद करण्यात आले आहे,’ असा आरोप इल्तिजा मुफ्ती यांनी केला आहे. जम्मू काश्मीरमधील निर्बंधांवरून माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती हिने सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादीचा लोकसभा उमेदवार झालेल्या त्या शिवसेना नेत्याची उद्या घर वापसी

मुंबई मनपाच्या ५८ हजार कोटीच्या फिक्स ठेवी तरी देखील मुंबई पाण्यात बुडते ; गडकरींचा शिवसेनेला घरचा आहेर

म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी जमले २ दिवसामध्ये २० कोटी

विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; काँग्रेस नेत्यांनी भोवया उंचावल्या

म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत केली वाढ

Leave a Comment