१८ लाख बक्षीस असणाऱ्या नक्षलवादी दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी |रितेश वासनिक ,

वर्षभरात विविध चकमकीत नक्षल्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवादी आत्मसमर्पण करीत आहेत. त्याच बरोबर आत्मसमर्पीत नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पीत करीत आहे.

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

मोठ्या नक्षल कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व १८ लाख ५० हजार रूपये बक्षीस असलेल्या २ जहाल नक्षल्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. दिपक उर्फ मंगरू सुकलु बोगामी (३०) आणि मोती उर्फ झुरू मज्जी (२८) अशी आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत. हे दोघेही पती – पत्नी आहेत.

खळबळजनक! रात्रीच्या अंधारात लातूर बस स्थानकावर गोळीबाराचा थरार

दिपक उर्फ मंगरू सुकलु बोगामी हा जुन २००१ मध्ये जागरगुंडा दलम मध्ये डी.व्ही.सी पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १७ चकमकीचे , १२ खुनाचे, ३ भुसुरूंग स्फोट घडवून आणल्या संबंधाने गुन्हे दाखल असून महाराष्ट्र शासनाने त्याचेवर एकुण ९ लाख २५ हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

राष्ट्रवादी नेत्याचे भन्नाट विधान ; अमोल कोल्हेंची बॉडी बघून त्यांना मिठीच मारू वाटते

मोती उर्फ झुरू मज्जी ही मार्च २००४ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्या म्हणून भरती होवून डिसेंबर २००७ मध्ये उत्तर बस्तर कंपनी क्रमांक १० मध्ये डी.व्ही.सी या पदावर कार्यरत होती. तिच्यावर १५ चकमकीचे व २ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने ९ लाख २५ हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

पार्थला उमेदवारी देण्याचे सिक्रेट पवारांनी केले ओपन

आत्मसमर्पीत माओवादी हे पती – पत्नी असुन दलम मध्ये काम करतांना महिलांवर होत असलेले अत्याचार तसेच दलम मधील माओवादी हे अल्पवयीन आदिवासी मुलींना पळवून नेवून बळजबरीने त्यांना दलममध्ये भरती करत होते, असे कबुल करत आदिवासींवर होणारे अनन्वयीत अत्याचार व माओवादी नेहमीच स्वतःच्या फायद्यासाठी जाणून – बुजुन दुर्गम व अति दुर्गम भागाचाच्या विकास कामात आडकाठी निर्माण करतात. या सर्व बाबींना कंटाळुन नक्षल्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत त्यांनी आत्मसमर्पण केले.

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा

आपल्याला विकासाच्या मुळ प्रवाहात परत जावून सामान्य पती – पत्नी सारखे जीवन जगता येईल की नाही? याबाबात आमच्या मनामध्ये साशंकता होती. परंतू पोलीस दलाने निर्माण केलेल्या विश्वासामुळे व महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पित योजनेमुळे आम्ही आज पोलीसांपुढे आत्मसमर्पण करत असल्याचे या आत्मसमर्पितांनी स्पष्ट केले आहे.

मलायकासोबत लग्न कधी करणार? अर्जुन कपूर म्हणतो…..

यावेळी त्यांनी दलममधील इतर नक्षल्यांनी देखील हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण योजनेचा फायदा घेत विकासाच्या मुळ प्रवाहात यावे असे आवाहन केले. विकास कामांना आडकाठी आणणाऱ्या नक्षल्यांवर पोलीस दल सक्षममणे कारवाई करण्यास तत्पर असुन जे माओवादीना विकासाच्या प्रवाहात सामील होणयास इच्छुक आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल असे आवाहन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे

नाशिकमध्ये आज ‘लाव रे तो व्हिडिओ’

Leave a Comment