पाणी फाउंडीशनचे श्रमदान करायला गेलेल्या ग्रामस्थांवर आदिवासींनी केला हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी |भिकन शेख ,

दुष्काळावर मात करून गावाला पाणीदार करण्यासाठी अमीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थावर डोंरावरील आदिवासी जमावाने केला हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मतेवाडी येथे घडली.

या हल्ल्यात 7 ते 8 ग्रामस्थ जखमी झाले असून त्यांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हल्लेखोरांनी 5 ते 6 मोटारसायकल देखील जाळून पोकलंड मशीनच्या काचा फोडल्या. अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे श्रमदान करणाऱ्यामध्ये खळबळ उडून पळापळ झाली.हल्ल्याचे कारण अस्पष्ट असले तरी डोंगराच्या पायथ्याशी काही आदिवासी जमीन कसत होते त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रमदान करणाऱ्यावर हल्ल्या करण्यात आल्याची राज्यातील ही पहिली घटना मानली जात आहे.

हल्ल्यात भाऊराव चव्हाण (वय ५५) संतोष बबन मते (वय २९), सुरेखा दगु मते (वय ३५)मुन्ना शहा (पोकलंड चालक) यांच्यासह इतर काही जण जखमी झाले आहे. वाटर कप स्पर्धेसाठी चांदवड तालुक्याची दुसऱ्यांदा निवड झाली असून 15 गावात 1 मे पासून श्रमदान केले जात आहे मतेवाडी येथे आज पासून ग्रामस्थांनी श्रमदान सुरू करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी आदिवासींनी श्रमदान करणाऱयावर हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे

Leave a Comment