शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा ढासळेलेला पोत सुधारण्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेचे एक स्टार खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आहेत. तर दुसरा स्टार उदयनराजे भोसले हे आहेत. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमापासूनच उदयनराजे भोसले या यात्रेला हजर राहिले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीत पक्ष शिस्त नाही की राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार होऊन फूट पडली आहे असा सवाल उभा राहत आहे.

सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची परत फेड करा : हर्षवर्धन पाटील

शिवनेरी किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी कलम ३७० संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. विरोधाला विरोध करावा परंतु चांगल्या निर्णयाला विरोध करू नये असे अजित पवार बोलून गेले. एकीकडे शरद पवार ३७०च्या निर्णयावर टीकास्त्र सोडत आहेत. तर अजित पवार या निर्णयाचे समर्थन करत आहेत. त्यामुळे राष्ट्र्वादीतच दोन गट पडले आहेत का असा सवाल पुन्हा पुन्हा समोर येतो.

पक्षांतर्गत बंडाळी थोपवण्यासाठी जि.प अध्यक्ष, उपाध्याक्षांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

तरुणांच्या मनात राष्ट्रवादीची प्रतिमा उंचावण्यासाठी राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना पुढे करून शिवस्वराज्य यात्रा आरंभली आहे. परंतु जुने जाणते नेते अमोल कोल्हेंना दिलेल्या या मोठ्या जबाबदारीवर खुश नाहीत अशी माहिती सूत्रांकडून पुढे येते आहे. दरम्यान संघर्ष यात्रा काढण्याच्या नियोजनात अग्रभागी असणारे जितेंद्र आव्हाड हे आता या यात्रेत कुठेच दिसत नाहीत. कारण त्यांचा तीव्र पुरोगामी चेहरा पक्षाला हानिकारक वाटू लागला आहे. अशा गटबाजीच्या विळख्यात सापडलेली हि संघर्ष यात्रा राष्ट्रवादीचा किती लाभ करून देणार हे येणाऱ्या काळातच समजेल.

म्हणून सुषमा स्वराज यांचे निधन होताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ढसाढसा रडले

नरेंद्र मोदी यांनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन

३७० कलमासंदर्भातील विधेयक लोकसभेत देखील संमत

अजित पवारांच्या त्या टीकेवर गिरीश महाजन म्हणतात

अजित पवारांची जीभ घसरली ; गिरीश महाजनांना म्हणाले ‘नाच्या’

Leave a Comment