छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | सोशल मीडियाच्या माध्यमातून छगन भुजबळ शिवसेनेत जाणारा अशा आशयाचे मॅसेज व्हायरल केले जात होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने पक्षांतील कार्यकर्त्यांचा जीव भांडयात पडला आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना शिवसेनेत घेण्याचा आपला कसलाच मनोदय नसून त्यांना शिवसेनेत कदापि घेतले जाणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे. ते नाशिकमध्ये एका सभेत बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्यासाठी विजय मार्ग प्रशस्त फक्त उमेदवारी करण्याची आवश्यकता

छगन भुजबळ जेलमध्ये असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी येवला या भुजबळांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी खिळखिळा करून टाकली आहे. येवला नगर परिषद देखील शिवसेनेने ताब्यात घेतली असून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीची पीछेहाट केली आहे. त्यामुळे भुजबळ यांना पराभवाची भीती आहे. त्यामुळे ते शिवसेनेत येऊ शकतात. अशा अवस्थेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एवढे वर्ष केलेली मेहनत वाया गेल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे छगन भुजबळ यांना पक्षात घेऊ नये अशी विनंती केली. ती विनंती उद्धव ठाकरे यांनी देखील मान्य केली आहे.

शिवेंद्रराजेंचा आमदारकीचा राजीनामा ; विधानसभा अध्यक्षांकडे दिला राजीनामा

दरम्यान आपण राष्ट्रवादी सोडण्याचा कसलाही विचार करत नाही अशी प्रतिक्रिया देखील छगन भुजबळ यांनी याआधी दिली आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येणार का हे बघण्यासारखे राहणार आहे. याआधी छगन भुजबळ यांना शिवसेनेने पराभूत केले आहे. १९९५ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार बाळा नांदगावकर यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला देखील शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा नाशिक मतदारसंघातून पराभव केला होता.

रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात

Leave a Comment