कपबशी नव्हे हे असणार वंचित आघाडीचे चिन्ह ; निवडणूक आयोगाचा चिन्ह बदलाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यातच संपन्न होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका घेणे क्रमप्राप्त असणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरु केली आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप सुरु केलं आहे. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह बहाल केले आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाला हिरा हे चिन्ह देण्यात आलं आहे.

आगामी निवडणुकीत वंचितला गॅस सिलेंडर घेऊन मैदानात उतरावे लागणार आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीला कपबशी हे चिन्ह मिळाले होते. दरम्यान वंचित आघाडीचे गॅस सिलेंडर हे चिन्ह कायम राहण्याची शकता आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीला कपबशी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात ते होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता अपक्ष उभा राहणाऱ्या उमेदवाराला गॅस सिलेंडर हे चिन्ह घेता येणार नाही.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

तर मी शिवसेनेची हमी घेतो : रावसाहेब दानवे

पूराने केलेला विध्वंस बघून भिडे गुरुजींना आले रडू

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील

पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी

राहुल गांधीनी दिली त्यांच्या मतदारसंघातील पूरग्रस्तांना भेट

पूरग्रस्तांसाठी संभाजीराजे करणार ५ कोटींची मदत

Leave a Comment