‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी ; नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी वेळी विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |सोमवार पासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे काम सध्या सुरु आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहेमान बर्क यांनी उर्दूतून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी दरम्यान मोठं मोठ्याने वंदे मातरमच्या घोषणा होऊ लागल्या त्यावर त्यांनी ‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी असल्याचा उच्चार केला.

बर्क यांनी ‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी असल्याची म्हणताच भाजपच्या खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात गदारोळ माजवला.तसेच मोठं मोठ्याने ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. खासदार बर्क यांनी उर्दूतून शपथ घेतल्यानंतर भारतीय संविधानाचा जय जयकार केला. तर ‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी असल्याचे खरमरीत विधान देखील केले.

लोकसभा नवनिर्वाचित खासदारांना काल आणि आज शपथ देण्याचे कार्य पार पाडले जात आहे. काल सोमवारी ३०० पेक्षा जास्त खासदारांनी शपथ घेतली. तर आज उर्वरित खासदारांना शपथ देण्यात आली. महाराष्ट्रातील खासदारांनी कालच लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.

Leave a Comment