शिवसेना प्रामुख्यांवर होणार वार स्वतःच्या अंगावर झेलणारा बाळासाहेबांचा निकटचा सहकारी हरपला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक भालचंद्र ठाकूर यांचे रविवारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर एक महिन्यांपासून हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने रविवारी सायंकाळी निधन झाले.

शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले भालचंद्र ठाकूर यांना भाऊदादा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपले सर्वस्व शिवसेनेत झोकून दिले होते. शिवसेनाप्रमुखांच्या प्रत्येक दौऱ्या दरम्यान ते त्यांच्यासोबत राहिले. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर असायचे. दरम्यान १९७० साली नागपूरच्या विमानतळावर बाळासाहेबांवर समाजकंटकांनी हल्ला चढविला होता. यावेळी ठाकूर यांनी जीवाची पर्वा न करता, तो हल्ला आपल्यावर झेलला. बाळासाहेबांना कुठलीही इजा न होता त्यांनी हल्लेखोरांना चांगला चोप देत पिटाळून लावले होते. तेव्हापासूनच बाळासाहेबांचे ते अत्यंत विश्वासू बनले.

दरम्यान. भालचंद्र ठाकूर वृद्धत्वामुळे मूत्रपिंड आणि फुफ्फुसांच्या समस्येने ग्रस्त होते. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात महिनाभरापासून उपचार सुरू होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, माजी महापौर महादेव देवले यांनी भालचंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. भालचंद्र ठाकूर यांच्यावर सोमवारी दादरच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment