विधानसभा निवडणूक २०१९ : अजित पवारांनी जाहीर केली धनंजय मुंडेंची ‘या’ मतदासंघातून उमेदवारी

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

शिरूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीने ढासळलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. हि यात्रा शिरूर येथे आली असता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथील जाहीर सभेत धनंजय मुंडे यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. या उमेदवारी बद्दल धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार देखील मानले आहेत.

शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट

शिरूर येथील सभेत अजित पवार यांनी धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील असे जाहीर केले आहे. त्यांच्या घोषणे नंतर उपस्थितांनी मोठा जल्लोष केला आणि अजित पवार यांच्या निर्णयाला अनुमोदन दिले. तसेच धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. तर धनंजय मुंडे यांनी देखील परळीच्या जनतेचे आभार मानत आपण शेवटच्या श्वासापर्यंत परळीच्या जनतेची सेवा करू असे ट्विट केले आहे.

सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची परत फेड करा : हर्षवर्धन पाटील

दरम्यान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचा सामना भाजपच्या नेत्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत अर्थात स्वतःच्या बहिणी सोबत आहे. त्यामुळे परळीची लढत मागील निवडणुकी प्रमाणे याही वेळी राज्याचे लक्ष वेधणारी ठरणार आहे.

बोटीत बसलेल्यांना कोण थांबवणार ; ब्रम्हनळी दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादामुळे कराडमध्ये हि पूरस्थिती आली : विजय शिवतारे

पूर परिस्थितीचा फायदा घेऊन दोन कैदी फरार

कॉंग्रेसचा हा माजी मंत्री वंचितकडून लढवणार विधनासभा निवडणूक?

शिवस्वराज्य यात्रा : अमोल कोल्हेंनी डागली देवेंद्र फडणवीसांवर तोफ

कृष्णा नदीत बचाव कार्याची बोट उलटून १५ जण बेपत्ता ; ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मिळणार वीर चक्र सन्मान

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com