विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी |जगमित्र कारखाना काढतो म्हणून शेतक-यांच्या जमिनी लुबाडणारे आणि तोडपाणी करणारे धनंजय मुंडे यांनी शेतक-यांना खोटे चेक दिले आणि पैसे लाटले. या प्रकरणी शेतक-यांनी त्यांना कोर्टातही खेचले. तरीही धनंजय मुंडे आरोप करत असून त्यांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे माजी मंत्री आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते आष्टी येथील एका जाहिर कार्यक्रमात बोलत होते.

धस म्हणाले की पंकजा यांच्यावरील आरोप ते केवळ राजकीय द्वेषातून करतात. आता हे जनतेला माहीत झाले आहे. मयत शेतक-यांच्या जमिनी लुबाडणा-यांना मुंडेंना ‘वैद्यनाथ’वर बोलण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनेचा मोर्चा म्हणजे एक नाटक होते. धनंजय मुंडे यांनी मोर्चात केलेले आरोप हे केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असून त्यांचा राजकीय द्वेष यानिमित्ताने पुन्हा उफाळून आला आहे. हा मोर्चा मुळातच पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विरोध करण्यासाठी होता, हे सिद्ध झाले असल्याचे धस म्हणाले.

पोषण आहारा संदर्भात पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी केलेला आरोप तर हास्यास्पद आहे, संवैधानिकपदावर असताना कुठलाही अभ्यास न करता बेछूट आरोप करण्याची सवयच त्यांना लागली आहे, सभागृहात ते एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळेच आता निवडणुकीचे निमित्त साधून हा रडीचा डाव ते खेळत आहेत, असे धस म्हणाले. गेल्या चार वर्षांच्या टीएचआरच्या टेंडर पोषण आहारमध्ये हजार पंधराशे कोटी कमावले. साधेसुधे नाही हजार पंधराशे मग शेतकऱ्यांच्या उसाचे पैशे कां ठेवता.. असा गंभीर आरोप धनंजय मुंडें यांनी पंकजा मुंडेंवर केला.

Leave a Comment