आणि झरिन खान ने चाहत्यांना बदडून काढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बाॅलिवुड अभिनेत्री झरिन खान आपल्या हटके अंदाज आणि हाॅट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतू आज झरिन ने औरंगाबाद येथे काही चाहत्यांना बदडून काढल्याने ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

हाती आलेल्या माहीतीनुसार, झरीन औरंगाबाद येथे एका मोबाईल शाॅपीच्या उद्घाटनाकरता गेली होती. यावेळी झरिन ला पाहण्याकरता तिच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली. दरम्यान मोबाईल शाॅपी मालकाने झरिन च्या सुरक्षेकरता बोलावलेले बाॅडीगार्ड्न गर्दी नियंत्रीत करण्यात कमी पडू लागले. अशात गाडीतून शाॅप पर्यंत चालत जाणे झरिणला अवघड जात होते. याचवेळी एका चाहत्याकडून जबरदस्ती झाल्याने झरिनचा संताप अनावर झाला आणि तिने त्या चाहत्याच्या कानशिलात लागावली.

यासर्व प्रकारामुळे झरिनला तब्बल २ तास मोबाइल शाॅपीमधे बसून रहावे लागले. झरिनच्या संताप पाहून चाहते बिथरले आणि त्यांनी सर्व बेरिकेट्स पाडण्यास सुरवात केली. पोलीस आल्यानंतर परिस्थिती अाटोक्यात आली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.

Zareer Khan Slaps Fans in Aurangabad | Bollywood Stars Fight with Fans | Hottest News

Leave a Comment