दुचाकीवर भरधाव वेगाने सासुरवाडीला जातांना एकाचा अपघातात मृत्यू

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

बुलढाणा प्रतिनिधी| दिवसेंदिवस रस्ते अपघातातील मृत्यूचा आलेख वाढत असून, अशीच एक दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहेकर मधील वरुड गावात घडली आहे. आपल्या गावातून सासुरवाडीला जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा झाडाला धडकून अपघातात मृत्यू झाला आहे. विष्णु मांगीलाल राठोड असे मयत इसमाचे नाव आहे. राठोड शिवसेना स्थानिक शाखा प्रमुख तथा उपसरपंच होते. राठोड आपल्या दुचाकीने भरधाव वेगाने सासुरवाडीला निघाले होते. परंतु दुचाकी जोरात असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी एका बाभळीच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेने वरुड व कनका या दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे व सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एक वेळा दुसऱ्या कुठल्या गाडीने धडक दिली असती तर त्याला दोष देता आला असता, पण स्वतः झाडावर जाऊन धडकल्यामुळे दोष तरी कुणाला देणारसवाल? वाहनाचा वेग मर्यादित असावा असे रस्त्याचे फलक पाहूनही आपण मात्र त्याकडे कायम कानाडोळाच करत असतो. परंतु हाच आपला हलगर्जी पण एखाद्या दिवशी आपल्याच जीवावर बेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपले जीवन किती अमूल्य आहे याची आपणच जाणीव ठेवणं गरजेचं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook