आमदार सिद्धाराम म्हेत्रेंची भाजपा नेत्यांसोबत ‘चाय पे चर्चा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेस राष्ट्रवादीमधून सेना भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे अन त्यात सर्वात आघाडीवर असणार नाव म्हणजे काँग्रेसचे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिद्धराम म्हेत्रे. स्थानिक भाजपा नेत्यांच्या विरोधामुळे या प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र, आज आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी बोलाविलेल्या ‘चाय पे चर्चा’ला तालुक्यातील भाजपा नेते उपस्थित होते.

यामध्ये शिवशरण खेडगी, दत्ता तानवडे, अमोलराजे भोसले, जय हिंद शुगरचे बब्रुवान माने उपस्थित होते. आता आमदार म्हेत्रे यांच्या या चाय पे चर्चने आगामी विधानसभेला अक्कलकोटचा भाजपचा उमेदवार कोण असणार या चर्चांना सोलापूर जिल्ह्यात उधाण आलं आहे. जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली असताना काँग्रेस अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे व पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच होती.

परंतु या दोन्ही नेत्यांनी अद्यापि राजकीय निर्णय घेतला नाही. दुसरीकड आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये स्वत:चे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसचे तालुक्याच्या पातळीवरील नेते भाजप किंवा शिवसेना प्रवेशाचा धडाका लावला आहे. या घडामोडीविषयीच्या चर्चेला सुरुवात झाली होती ती अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे व पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेवर. या दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांच्या बैठकांवर बैठका घेऊ न त्या दृष्टीन हालचालीही चालविल्या होत्या.

Leave a Comment