राजकारणात जातीचे कार्ड खेळणाराला गडकरी म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी | भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीय राजकारणावर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. जेव्हा लोक स्वकर्तृत्वावर तिकीट मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीच्या आधारावर तिकीट मागू लागतात हे अयोग्य आहे असे ठोक मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नागपुरात माळी समाजाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

महात्मा फुले शिक्षण संस्थेने त्यांच्या कार्याची ६० वर्ष पूर्ण केल्या बद्दल एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांना आमंत्रित केले असता त्यांनी जातीय राजकारणावर चांगलाच प्रहार केला आहे. आपल्या जातीला आरक्षण नसल्यानेच आपली प्रगती झाली असे देखील नितीन गडकरी म्हणाले आहेत. महिला आरक्षणाची मागणी केली जाते. मात्र इंदिरा गांधी ,सुषमा स्वराज, वसुंधरा राजे यांच्यासारख्या महिला राजकारणात पुढे गेल्या त्या महिला आरक्षण नसताना हि गोष्ट देखील विचारात घेतली पाहिजे असे गडकरी म्हणाले आहेत. अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यापाठीशी फक्त माळी समाज आहे म्हणून नव्हे तर त्यांच्या पाठीशी सर्व जातीची जनता उभा राहिली म्हणून ते मुख्यमंत्री झाले असे गडकरी म्हणाले आहेत.

आपल्या जातीला आरक्षण नाही म्हणून आपण एवढी प्रगती साधू शकलो अन्यथा एखादया ऑफिस मध्ये आपण क्लर्क अथवा बाबू असलो असतो असे गडकरी म्हणाले. आपण आपल्या घरच्यांना नोकरी करणार नाही हा निर्णय सांगितला तेव्हा आईने तर तुझे लग्न सुद्धा होणार नाही असे भावनिक उद्गार काढले. मात्र तेव्हा आपण उद्योगशीलतेचे धडे घेतले नसते तर आपली एवढी प्रगती झाली नसती असे गडकरी म्हणाले आहेत.

Leave a Comment