ब्रेथ एनालायझर टेस्टमध्ये ‘या’ एअरलाइन्सचे कर्मचारी विमानतळावर मद्यधुंद अवस्थेत आढळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळावर वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये केलेल्या तपासणीत, सुमारे 12 विमानतळ चालक, अग्निशामक आणि विमान देखभाल कर्मचारी कामावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळले. वृत्तानुसार यामध्ये इंडिगो, देशातील सर्वात मोठी एअरलाइन स्पाइसजेट आणि इंडियन ऑइलच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे, यामुळे उड्डाण सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे कारण अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. याआधी फ्लाइट रेग्युलेटरच्या तपासणीतही उड्डाणाच्या काही तास आधी वैमानिक नशेत असल्याचे आढळून आले होते.

डिसेंबरमध्ये धोरणात बदल
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, भारताने आपले विमानचालन चाचणी धोरणात बदल केला. आता ब्रेथ एनालायझर टेस्टमध्ये विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश केला गेला आहे. देखभाल कर्मचार्‍यांसाठी किंवा कोणत्याही कारणास्तव कॉकपिटमध्ये जाणार्‍या कोणत्याही व्यक्तीसाठी (ऑडिट, ट्रेनिंग इ.) ब्रेथ एनालायझर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.

याशिवाय या लिस्टचा आणखी विस्तार करत बॅगेट कार्ट ड्रायव्हर्स, लोडर, पुश-बॅक ऑपरेटर आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांचा देखील समावेश केला गेला आहे. भारतीय विमानतळाची सुरक्षा जागतिक बेंचमार्कच्या बरोबरीने आणण्यासाठी भारताने हे केले आहे. गेल्या वर्षी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी शून्य असली तरीही अल्कोहोलचा प्रभाव सुमारे 36 तास टिकू शकतो असे निदर्शनात आले आहे.

काय कारवाई केली जाऊ शकेल ?
या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, पहिल्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला निलंबित केले जाऊ शकेल. मात्र तो पुन्हा या अवस्थेत पकडला गेला तर त्याचा विमानतळावर काम करण्याचा परवाना रद्द होऊ शकेल.

इंडिगोचे स्टेटमेंट
इंडिगोने यावर प्रतिक्रिया दिली आहे की, जानेवारीमध्ये कोरोना विषाणू आपल्या शिखरावर होता, अशा परिस्थितीत काही औषधांच्या वापरामुळे कर्मचारी ब्रेथ एनालायझर टेस्टमध्ये फेल होऊ शकतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ते प्रत्येक नियम पाळत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment