BREKING NEWS : राष्ट्रवादीच्या सातारा येथील कार्यालयावर दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थाना बाहेर शेणीच्या गोवऱ्या पेटवल्याचा खळबळजनक प्रकार घडला. त्यानंतर लगेचच सातारा येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठा आरक्षण रद्द केल्याचे सातारा शहरात पडसाद पहायला मिळाले.

सातारा शहरात राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यालय आहे. या कार्यालयावर दगडफेक करून काच फोडण्यात आली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे, तेजस शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कार्यालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर सातार्‍यात दगडफेक; शशिकांत शिंदेंनी दिले कारवाईचे निर्देश

भाजप केवळ मराठा आरक्षणांत राजकारण करत आहे ः आ. शशिकांत शिंदे

राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक ही घटना दुर्देवी आहे. येत्या 24 तासांच्या आत आरोपींना अटक करावी. कोणीही राजकारण करू नये. आमचा राष्ट्रवादी पक्ष मराठ्यांच्या सोबत नेहमीच आहे. कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. भाजपाची भूमिका मराठा आरक्षणाची नाही. कालच याचिककर्ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्य सरकार यांच्यावर मराठा आरक्षणांसाठी खापर फोडत होते. काहीजण प्रत्येक गोष्टीत राजकारण करून वातावरण दूषित करण्याचे काम करत आहे. भाजप केवळ जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याचे आ. शशिकांत शिंदे असल्याचा आरोप केला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment