BREKING NEWS : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया : तब्बेत एकदम ठीक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आताच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. त्यांची तब्बेत आता एकदम ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पवारांच्यावर पित्ताशयात खडे झाल्याने दोन आठवड्यापूर्वी शस्रक्रिया करण्यात आली होती. 15 दिवसानंतर आज त्यांच्या पित्ताशयावर शस्रक्रिया करण्यात आली. शरद पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना ३० मार्च रोजी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पित्ताशयातून खडा काढण्यात आला होता. ते काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. त्यानंतर ३ एप्रिलला त्यांना घरी सोडण्यात आले होते.

शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले आहेत. पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते. पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते.

पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते. कधी कधी पित्त इतकं घट्टं होतं की त्याचे खडे तयार होतात. हेल्थलाईनच्या माहितीनुसार पित्ताशयात खडे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे पित्तात कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं. कधी कधी पित्त इतकं घट्टं होतं की त्याचे खडे तयार होतात. हेल्थलाईनच्या माहितीनुसार पित्ताशयात खडे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे पित्तात कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं.

You might also like