bride : नववधू स्वतःच्याच लग्नात ‘चंद्रा’ होऊन थिरकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा या गाण्याने सध्या सगळ्यांना भुरळ पाडली आहे. सध्या अशाच एका नववधूचा (bride) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती स्वतःच्याच लग्नात चंद्रा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नववधूचा (bride) हा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अजून समजू शकलेले नाही. मात्र या नववधूचा (bride) हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

स्वत:च्याच लग्नात मनसोक्त नाच

साधारणपणे लग्नात नववधू (bride) आणि वर यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मनसोक्त नाचताना आपण पाहत असतो. त्याचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. काही जण तर इतके बेभान होतात, की त्यांना आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत, याचेदेखील भान राहत नाही. लग्नात नातेवाईक आणि मित्रमंडळींचे डान्स तर आपण नेहमीच पाहत असतो. आता चक्क नववधूच (bride) नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्वत:च्याच लग्नात ही नववधू अशी काही थिरकली आहे उपस्थित लोकांनीदेखील तिला दाद दिली आहे.

चंद्रा गाण्याने सगळ्यांना घातली भुरळ

अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी सिनेमा 29 एप्रिलला रिलीज झाला. या सिनेमात चंद्रा ही लावणी असून अमृता खानविलकरने यावर नृत्य केले आहे. सिनेमातील या गाण्याने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता नववधूंनादेखील (bride) या गाण्याने भुरळ घातली आहे.

हे पण वाचा :

EPFO: नोकरी बदलल्या नंतर PF ट्रान्सफर करावा हे समजून घ्या

कोणत्या बँकांमध्ये RD वर सर्वाधिक व्याज मिळत आहेत हे जाणून घ्या

Cyber Froud : ऑनलाइन अकाउंट्स आणि आर्थिक डेटा सुरक्षित कसा ठेवावा ??? अशाप्रकारे जाणून घ्या

खुशखबर !!! आता Yes Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 75 मध्ये फ्री कॉलिंग सहित मिळतोय 2.5GB डेटा !!!

Leave a Comment