लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने दाखवला आपला खरा चेहरा; नवरदेवाने घेतली पोलिसांत धाव

लखनऊ : वृत्तसंस्था – लग्न म्हंटले कि घरात एकदम आनंदी वातावरण निर्माण होते. यामध्ये दोन परिवार एकत्र येत असतात. पण लखनऊमध्ये एक अशी घटना घडली आहे. त्यामध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवी नवरी घरातील दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. यामुळे घरात एकच गोंधळ उडाला आहे. यानंतर नवरदेवाने पोलिसांत तक्रार दाखल करून नवरीला अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच नवरदेवाने हे लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीनंदेखील एक लाख रुपये लुटल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशमधील महोबाच्या भटीपुरा या ठिकाणचा रहिवासी असलेल्या शेलेंद्र कुमार यांनी सांगितले कि,की त्याची आई आणि मावशी यांच्यात त्याच्या लग्नाची बातचीत सुरू होती. याच दरम्यान बम्हौरीकलां चरखारी गावातील रहिवासी असलेल्या एका युवकाने त्याच्याकडे एक स्थळ असल्याचे सांगत लग्नाची बातचीत सुरू केली. मुलीकडच्या लोकांची परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत तुम्हीच लग्नाचा संपूर्ण खर्च करा, असेदेखील तो म्हणाला. यानंतर मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला आणि लगेचच मध्यस्थी करणाऱ्या युवकाने लग्नाच्या खर्चासाठी एक लाख रुपये घेतले. हे लग्न एका मंदिरात पार पडले. लग्नानंतर नवरी सासरी येताच घरात ठेवलेले दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे.

नवरदेवाने सांगितले कि,की नवरी गायब होताच मध्यस्थी करणाऱ्या युवकाला याबाबतची माहिती देण्यात आली तसेच पोलिसांना देखील याची माहिती दिली. मात्र आता मध्यस्थी करणारा युवक घरच्यांना फोनवर धमकी देत आहे.तसेच लोकांना लग्नाचे आमिष दाखवून लूट केली जात असल्याचे सांगितले.