धावत्या चारचाकीने घेतला पेट; पहा ही थरारक घटना

 

औरंगाबाद | शहरात या आधीही अशा घटना बऱ्याच वेळा पाहायला मिळालेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका रुग्णवाहिकेला आग लागून तिथच विस्पोट झाल्याची घटना घडली होती.

अशीच चारचाकीला आग लागण्याची घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अचानक अचानक या धावत्या कार पेट घेतला आणि वाहनचालकाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली मात्र कार जळून खाक झाली या घटनेमुळे थोड्या प्रमाणात औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांच्या आणि रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांच्या मदतीने आग विझवण्यात आली आणि वाहतूक कोंडीही सुरळीत करण्यात आली.

You might also like