औरंगाबाद | टोळी युद्धातून चार ते पाच जणांनी एका 22 वर्षीय तरुणाला अडवत रॉड, दांडा, तलवारीने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता रक्तबंबाळ अवस्थेत तडफडणाऱ्या जखमी तरुणावर आरोपीनी लघुशंका करीत व्हिडिओ बनविला. या मारहाणीत तरुणांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री शहरातील हनुमाननगर भागात घडली. या घटनेमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे. अजय राजपूत वय-22 (रा.पुंडलिक नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या धक्कादायक घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित तरुण सराईत गुन्हेगार आहे. त्याचे काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टोळीशी भांडण झाले होते. आरोपीचे ज्या टोळीशी भांडण झाले होते. त्यांच्यासोबत अजयची उठबस होती. रविवारी रात्री अजय हनुमाननगर येथून आरोपीच्या घराजवळून जात असल्याचे दिसताच आरोपीनी अजयला अडविले व चार ते पाच जणांना दांडे, तलवार, रॉडने हल्ला चढविला. या हल्ल्यात अजय रक्त बंबाळ होऊन गंभीर जखमी झाला व रस्त्यावर कोसळला. एवढ्यावरच न थांबता आरोपीनी रस्त्यावरच रक्ताने माखलेल्या आणि वेदनेने व्हीव्हळत असलेल्या अजयवर लघुशंका केली. व या घटनेचा व्हिडिओ बनविला अशी माहिती उपस्थितांनी दिली. त्यानंतर अजय तसाच जमिनीवर पडलेला होता.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/302613571619476/
ही माहिती काही तरुणांनी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनस्थळी दाखल होत. अजय ला रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच संशयित आरोपिना ताब्यात घेतले असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. ओळख परेड बाकी असल्याचे कारण समोर करीत पोलिसांनी आरोपी बाबत माहिती देणे टाळले.
अजयने मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत सांगितली आरोपीची नावे
पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जखमी अवस्थेत अजयची विचारपूस केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये गणेश तनपुरे, राजेश तनपुरे व इतर अशा आरोपीनी हल्ला केला असल्याचे अजय मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत सांगत असल्याचे दिसत आहे.