धक्कादायक ! वहिनीवरील प्रेमासाठी आरोपीने पत्नीचीच केली हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटना : वृत्तसंस्था – बिहारमधील मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या वहिनीसोबत अवैध संबंध ठेवण्यासाठी पत्नीची हत्या केली आहे. हा आरोपी फक्त केवळ हत्या करून थांबला नाही तर त्याने धारदार हत्याराने पत्नीच्या मृतदेहाचा तुकडे तुकडे केले आणि ते लपवण्याचा प्रयत्न केला. मृत महिलेचे नाव संजू देवी असे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

घटनेनंतर पतीसह अन्य सदस्य फरार
या हत्येनंतर आरोपी पतीसह घरातील अन्य सदस्यसुद्धा फरार झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, फुलवरिया पोलीस ठाणे हद्दीत राहणारी संजू देवीचं लग्न मीरगंज येथील विजय गोंडसोबत झालं होतं. मृत संजू देवी हिला दोन मुलंही आहेत. मात्र पतीचे त्याच्या वहिनीसोबत अवैध संबंध होते. यामुळे मृत संजू देवी आपल्या पतीच्या वहिनीसोबत असलेल्या अवैध संबंधाला विरोध करत होती. मात्र पती वहिनीविरोधात एकही शब्द ऐकून घेत नव्हता. यावरून तो आपल्या पत्नीला मारहाणसुद्धा करत होता. यामुळे मृत संजू देवी आपल्या माहेरी निघून गेली.

माहेराहून पत्नीला बोलावून केली हत्या
यानंतर संजू देवी 25 फेब्रुवारी रोजी आपल्या माहेराहून सासरी आली. त्याच रात्री पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या संजू देवीवर पतीने तलवारीने वार केले. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. यानंतर तो वहिनीसोबत मिळून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करू लागला. यादरम्यान हि गोष्ट मृत संजू देवीच्या माहेरच्यांना समजली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा अंगणात रक्त सांडलं होतं. आणि आरोपी आणि त्याच्या वहिनीसह संपूर्ण कुटुंब घर सोडून फरार झाले होते. यानंतर पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

Leave a Comment