वंचितचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन यांचा एकनाथ खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन | बुलढाणा जिल्ह्यातील तरोडा,धामणगाव, बडे टाकळी येथील १५० कार्यकर्त्यांसह बहुजन वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भारतीय जनता पार्टी व इतर पक्षातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आज बहुजन वंचित आघाडीचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवरती राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथराव खडसे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे उपस्थित होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले, मी तुम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. गेल्या वेळी बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विकासाचे राजकारण केले. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा कधी पक्ष विचारला नाही हे पुर्ण बुलडाणा जिल्हयाने अनुभवले. माझ्याकडे असणाऱ्या विविध खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला त्यातुन विविध विकास कामे पार पडली, मलकापूर नांदुरा व इतर नगरपालिकासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून रस्ते व इतर विकास कामे मार्गी लावली. संपूर्ण जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करून तत्काळ दुष्काळी मदत मिळवून दिली.

याप्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, शहादा माजी आमदार उदेसिंग पाडवी, डॉ तुषार सनांसे, माधव पाटील, विलास धायडे, अनिल वराडे, निलेश पाटील, शिवराज पाटील, बापू ठेलारी, राहुल पाटील, अभय देशमुख, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment