बुलढाण्यात दुचाकी आणि रिक्षाचा भीषण अपघात, CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-वाडी या रस्त्यावर रिक्षा आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) दुचाकीस्वारांनी मागून भरधाव येऊन रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात (accident) दुचाकीवरील 2 जण जखमी झाले आहेत. या दोन वाहनातील धडक इतकी जोरदार होती की रिक्षा चक्क विरुद्ध दिशेने फिरली. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय घडले नेमके?
दीपाली नगर खामगाव जवळ हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात (accident) झाला त्यावेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. सर्वसामान्यपणे वर्दळ होती. या दरम्यान रिक्षा समोरच्या दिशेतून येत होती. पण रिक्षा चालकाने मागेपुढे फार गाड्या नसल्याने यु टर्न मारला. नेमकं त्याचवेळी मागच्या बाजूने एक भरधाव वेगात दुचाकी आली. ही दुचाकी जोरात रिक्षाला धडकली आणि दुचाकीवरील दोघेजण खाली पडले.

या दुचाकीने रिक्षाला एवढ्या जोरात धडक दिली कि रिक्षा थेट विरुद्ध दिशेला फिरली. या अपघातानंतर (accident) स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि पुढील तपासाला सुरुवात केली.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत

Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!

‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…

Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!

दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय