हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) …. भारताचा नंबर 1 चा गोलंदाज… डावाच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद याच बुमराहमध्ये आहे. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात (IND Vs BAN Test Match) हे पुन्हा एकदा सिद्ध झालं… आपल्या खतरनाक इन स्विंगच्या जोरावर बुमराहने बांगलादेशचा सलामीवीर शादमान इस्लामचा बोल्ड काढला आणि बांगलादेशला पहिला झटका दिला. सोशल मीडियावर बुमराहचा हा विडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
अशी केली शादमान ची शिकार-
डावाचे पहिले षटक घेऊन आलेल्या बुमराहने अगदी अचूक डोक्याचा वापर करत शदमान इस्लामला आऊट केलं. बुमराहने ओव्हर मधील पहिले पाचही चेंडू ओव्हर द विकेट टाकले. बुमराहने जबरदस्त आऊट स्विंग करत पहिले ५ चेंडू बाहेर काढले. मात्र सहाव्या चेंडूवर बुमराहने शदमान इस्लामला गंडवले. हा चेंडूही बाहेर जाईल असा शदमानचा अंदाज होता. त्यामुळे त्याने चेंडू सोडला.. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आणि थेट इनस्विंग होत चेंडू स्टंपवर जाऊन आदळला. बुमराहाने शदमान इस्लामला अक्षरशा मामा बनवलं.
Boom Boom Bumrah 🎇
— BCCI (@BCCI) September 20, 2024
Cleans up Shadman Islam with a peach of a delivery.
Live – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/RYi9AX30eA
दरम्यान, भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशच्या संघाला सुद्धा पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. सध्यस्थितीत बांगलादेशची धावसंख्या ९६-७ अशी आहे. मेहंदी हसन मिराज आणि हसन मेहमूद मैदानावर आहेत. शदमान इस्लाम, झाकीर हुसेन, नाजमूल हुसेन शांतो, मुशफिकर रहीम आणि शाकिब अल हसन यांसारखे फलंदाज करिश्मा दाखवू शकले नाहीत. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह , आकाश दीप आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ बळी घेतले तर सिराजने एक विकेट घेतली.