आई वडिलांवर असलेल्या पीक कर्जाच्या ओझ्यामुळे हतबल झालेल्या तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आष्टी : हॅलो महाराष्ट्र – देशात कोरोनाने शिरकाव केल्याने राज्यात सतत लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही जणांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची अवस्था खूप बिकट आहे. या लोकांच्या डोक्यावर कर्ज आहेत व त्यांच्या हाताला रोजगारदेखील नाही आहे. अशा द्विधा परिस्थितीमध्ये सापडलेल्या अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अशाच प्रकारची एक घटना परतूर तालुक्यातील आष्टी याठिकाणी घडली आहे.

काय आहे प्रकरण
आष्टी येथील एका तरुणाने आई वडिलांवर पीक कर्जाचं ओझ आणि सततच्या लॉकडाऊनला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणाचे नाव योगेश साहू तिखे आहे. त्याने 22 मे रोजी रात्री एकच्या सुमारास घराजवळील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आई वडिलांवर कर्जाचे ओझे होते, हाताला रोजगार नाही, सततच्या लॉकडाऊनमुळे अन्य काही करतासुद्धा येत नव्हते अशा अनेक अडचणींनी घेरलेल्या या तरुणाने अखेर टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अवघ्या 25 व्या वर्षी वयात आलेल्या मुलाने आत्महत्या केल्याने तिखे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यानंतर मृत योगेशच्या आत्महत्येची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून त्यांनी तो मृतदेह आष्टी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला यानंतर रात्री उशिरा मृत योगेशवर आष्टी याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment