घरफोडी : अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह 9 लाख 30 हजारांचा मुद्देमाल केला लंपास

फलटण प्रतिनिधी |  प्रभाकर करचे

फलटण तालुक्यातील पाच सर्कल खामगाव येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 9 लाख 30 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पाच सर्कल, खामगाव तालुका फलटण येथील बंद घराचे दरवाज्याचा कडी व कोयंडा तोडून, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून, घरातील लोखंडी राजाराणी कपाटातील 9 लाख 5 हजार 310 रुपये किमतीचे दागिने व कपाटा शेजारील लोखंडी कपाटातील रोख रक्कम 25 हजार रुपये, असा एकूण 9 लाख 30 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेण्यात आला आहे.

सदरच्या घटनेची फिर्याद शोभा माणिक पवार यांनी दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये भा. द. वि. सं. कलम 457 , 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करत आहेत.

You might also like