व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरदिवसा एका चालत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या बर्निंग ट्रकचा (Burning Truck) एक व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या आगीमागंच कारण फार भयानक आहे. वातावरणातील तापमान वाढल्यामुळे या ट्रकला ही भीषण आग (Burning Truck) लागली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

काय घडले नेमके ?
भंडारा जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे ट्रक ओव्हर हिट झाला आणि त्याला भीषण आग लागली. हा ट्रक गिट्टी घेऊन जात होता. याच दरम्यान ओव्हर हिट झाल्याने ट्रॅकला भीषण आग (Burning Truck) लागली. हि धक्कादायक घटना भंडारा-साकोली राष्ट्रीय महामार्ग 6 वरील गडेगाव या ठिकाणी घडली आहे. सुदैवाने या घटनेत चालक आणि त्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी ट्रकखाली लगेच उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

या घटनेची माहिती गडेगाव वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत ट्रॅकचे कॅबिन पूर्णपणे जळून खाक झाले होते. या आगीच्या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. या आगीमध्ये ट्रक (Burning Truck) चालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम

‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!

मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका