विजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या बसला अचानक आग; पाच जणांचा होरपळून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । विजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली. या आगीत बसमधील पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. कर्नाटकमधील केआरहल्ली गावाजवळची रात्रीची घटना. कुक्केरी श्री ट्रॅव्हल्स कंपनीची बस २९ प्रवाशांना घेऊन विजापूरहून बंगळुरुला जात होती. रात्री ९ वाजता ही बस विजापूरहून निघाली असता अचानक पेटली. दरम्यान, या आगीच कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, विजापूर-बंगळुरु मार्गावर रात्री ९ वाजण्याचा सुमारास चालत्या बसला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीने बसला पूर्णत: वेढल्याने बसमधील प्रवाशांचा आरडा-ओरडा ऐकू येत होता. तोपर्यंत बसने पूर्णपणे पेट घेतल्याने अनेकजण जखमी झालेत. मात्र या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment