Business Idea : सेंद्रिय खतांचा व्यवसाय करून मिळवा लाखो रुपये !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : आजकाल लोकं आपल्या आरोग्याबाबत खूप सजग झाली आहेत. ज्यामुळे बाजारात सेंद्रिय शेती उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढते आहे. कीटकनाशके आणि कृत्रिम खते वापरलेल्या भाज्या आणि फळांना नकार देत लोकं त्यापासून अंतर राखत आहेत. अशा परिस्थितीत, जर आपणही शेतीशी संबंधित एखाद्या व्यवसायाच्या शोधात असाल तर लोकांच्या या बदलत्या जीवनशैलीचा फायदा घेऊन आपल्याला सेंद्रिय खताचा व्यवसाय सुरू करता येईल.

सेंद्रिय खतामुळे पिकांची गुणवत्ता तर सुधारतेच त्या शिवाय जमिनीची सुपीकताही कायम राहते. त्याचबरोबर सेंद्रिय खतापासून पिकवलेली फळे आणि भाज्यांचा शरीरावर देखील कोणताही वाईट परिणाम होत नाही. त्यामुळेच आजकाल अनेक शेतकरी सेंद्रिय खताला महत्त्व देऊ लागले आहेत. यामुळे त्यांची मागणी देखील वाढू लागली आहे. चला तर मग हा व्यवसाय कसा सुरू करावा आणि त्याद्वारे किती नफा मिळेल हे जाणून घेउयात … Business Idea

The Best Garden Fertilizers of 2022 - Picks from Bob Vila

सेंद्रिय खताच्या व्यवसायासाठी किती पैसे लागतील ???

यामध्ये सुरुवातीला आपल्याला थोडे जास्त पैसे लागू शकतात. जर पैशांची कमतरता असेल तर त्यासाठी आपल्याला कर्जही मिळेल. छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1-5 लाख रुपये लागतील. आपल्याकडे असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर सेंद्रिय खत तयार करता येईल. यानंतर आता बायो रिएक्टर, बायो फर्मेंटर, ऑटो क्लेव्ह, बॉयलर, आरओ प्लांट, कंपोस्ट शिलाई मशीन, कंप्रेसर, फ्रीझर, कन्व्हेयर्स सारख्या मशीन्स घ्यावा लागतील. यासोबतच आपल्याला जीएसटी रजिस्ट्रेशनसह खताचा परवाना देखील घ्यावा लागेल. Business Idea

Fertilizer prices expected to remain higher for longer

कच्चा माल म्हणून काय वापरावे ???

सेंद्रिय खत तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून कोंबडी खत, शेणखत, मेंढ्याचे खत, कृषी कचरा आणि रॉक फॉस्फेट लागेल.

सेंद्रिय खतांपासून मिळणारे उत्पन्न

या व्यवसायातून मिळणारा नफा हा त्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. या व्यवसायात आपल्याला एकूण खर्चाच्या 20-21 टक्के नफा मिळू शकेल. म्हणजेच, जर आपण 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर एकूण कमाई 6 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि आपला निव्वळ नफा हा 1 लाख रुपये असेल. Business Idea

Want to control your spending? Try the 30-Day Rule | Mint

हे पण वाचा :

PAN-Aadhaar Link : आता 30 जूनपर्यंत पॅन-आधार लिंक केले नाही तर द्यावा लागणार दुप्पट दंड !!!

PM Kisan: 11वा हप्ता चुकलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! सरकारने e-KYC ची मुदत वाढवली

Gold Price : सोन्याच्या स्पॉट किंमतीत घट, सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या

Multibagger stock : अवघ्या काही महिन्यांत ‘या’ 5 पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला 2700% रिटर्न !!!

EPF कि NPS यापैकी रिटायरमेंटसाठी कोणती योजना चांगली आहे हे समजून घ्या

Leave a Comment