हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना हंगामानुसार व्यवसाय करून लाखो रुपये कमवण्याचे स्वप्न असते, त्यांच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. आता हिवाळ्याचा हंगाम सुरु झाला असून, या हंगामात उबदार कपड्यांची मागणी मोठ्याप्रमाणात वाढत असते. जॅकेट्स, स्वेटर्स, शाली, हिवाळी इनरवेअर यासारख्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकवर्ग बाजरात प्रचंड गर्दी करताना दिसतात. त्यामुळे हा काळ लहान आणि मध्यम व्यावसायिकांसाठी मोठी संधी ठरू शकते. तुम्ही योग्य नियोजन आखून तसेच त्याच्या जोडीला मार्केटिंगची मदत घेऊन हिवाळी कपड्यांच्या व्यवसायातून लाखोंची कमाई करू शकता. तर चला पाहुयात व्यवसाय सुरु करण्याच्या काही टिप्स .
व्यवसाय उंचीवर घेऊन जाण्यासाठी टिप्स
काही महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय उंचीवर घेऊन जाऊ शकता. त्यासाठी तुम्ही बाजाराचा सखोल अभ्यास करणे महत्वाचे असते . म्हणजे आपल्या भागातील हवामान, तापमान आणि ग्राहकांची गरज समजून योग्य उत्पादनांची निवड करावी . कमी तापमानात उबदार कपडे विक्रीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही अशा कपड्यांचे उत्पादन करावे. तुम्ही उत्पादित केलेल्या कपड्यांचा दर्जा चांगला असला पाहिजे , म्हणजे ग्राहकवर्ग त्याकडे जास्त आकर्षित होईल. जास्त नफा कमवण्यासाठी तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यापक ग्राहकांपर्यंत पोहचता येते.
Buy 1 Get 1 ऑफर्सचा वापर
हंगामी ऑफर्स जसे की सवलत योजना किंवा Buy 1 Get 1 अशा ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करतात आणि विक्री वाढवतात. त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया जाहिरातिचा वापर करून जास्त फायदा कमाऊ शकता. थेट संपर्क राखण्यासाठी स्थानिक बाजारपेठ, प्रदर्शन आणि मेळाव्यांमध्ये स्टॉल्स लावणे देखील फायदेशीर ठरते. यामुळे ग्राहकांसोबत विश्वास आणि चांगला संबंध निर्माण होतो.
कमी गुतंवणूकीतून जास्त नफा
जर तुम्हाला छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करायचा असेल, तर 2 ते 3 लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो. मात्र मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्याचा विचार असेल, तर 5 ते 7 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हा हंगामी व्यवसाय सुरु केल्यामुळे तुम्ही व्यवसायात सरासरी 30 % ते 40 टक्के नफा मिळवू शकता . हिवाळ्याच्या या हंगामी व्यवसायातून कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर नफा कमावण्याची उत्तम संधी आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनासोबत व्यवसाय सुरू करा आणि थंडीत लाखो रुपये कमवा.