1 ऑक्टोबरपासून LED TV खरेदी करणे होणार महाग, सरकारने मोठा निर्णय घेतला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । जर आपण कलर टेलिव्हिजन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर ते 1 ऑक्टोबरपूर्वी खरेदी करणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कारण सरकारच्या निर्णयामुळे याच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार (Government of India) ने ओपन सेल (Open Cell) च्या इंपोर्ट (Import) वरील 5% कस्टम ड्युटी सवलत काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे असे मानले जात आहे कि, आता टीव्ही खरेदी करणे महाग होऊ शकते.

रंगीत टेलीव्हिजनसाठी ओपन सेल हा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्याच वेळी, ओपन सेलच्या आयातीवर शुल्क लागू केल्यामुळे आता भारतात टेलिव्हिजन (टीव्ही) च्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

LED TV मध्ये ओपन सेल पिक्चर ट्यूबसारखे काम करते जे भारतात तयार होत नाही. टीव्ही तयार करणाऱ्या कंपन्या हे ओपन सेल आयात करतात, ज्यांवर अद्याप कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु ऑक्टोबरपासून या ओपन सेल्सच्या आयातीवर सरकार 5 टक्के शुल्क आकारणार आहे.

किती महाग होईल TV ?
सरकारच्या या निर्णयामुळे टीव्हीची किंमत 600 ते 1500 रुपयांपर्यंत वाढू शकते. परंतु सरकारचे असे म्हणणे आहे की, या निर्णयाचा परिणाम केवळ 150-250 रुपये इतकाच होईल. देशात मॅन्युफॅक्चरिंग वाढले आहे, म्हणूनच ड्यूटी आणि टीव्ही सेट्सच्या आयातीवरील सूटवर बंदी घालण्यात आली आहे.

आता काय होईल ?
टेलिव्हिजन उत्पादकांच्या मते, ओपन सेल्सवरील ड्यूटीमुळे आसियान देशांकडून भारतात LED TV च्या आयात पुन्हा वाढू शकते कारण भारताचा आसियान देशांशी मुक्त व्यापार करार (FTA) आहे. कलर टीव्हीच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे, परंतु आसियान देशांसोबत FTA मुळे TV त्या देशांतून आयात करता येऊ शकते.

ओपन सेलचे उत्पादन सुरू करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता आहे आणि यासाठी कमीतकमी 3-4 वर्षे लागतील. एलजी सारखी कंपनी भारतात टीव्ही बनविण्यासाठी ओपन सेल वापरते जी आयातीमध्ये बदल करू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment