हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीच्या शाहीन बाग भागात एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या तरूणाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीतील शाहीन बाग येथे आंदोलन होत आहे. यापूर्वी दिल्लीच्या जामिया भागात नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका अल्पवयीन मुलाने गोळीबार केला होता. यात एक विद्यार्थी शादाब जखमी झाला. यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली.
Delhi: The man, who had fired bullets in Shaheen Bagh area, has been taken by police into their custody. More details awaited. https://t.co/MmCwK1l58m pic.twitter.com/cDmaDrIXa6
— ANI (@ANI) February 1, 2020