छत्रपती संभाजीनगर, दि.२ : देशभरातील चित्रपट दिग्दर्शक व निर्मात्यांना सुवर्णसंधी देणारा ११ वा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (AIFF) दिनांक २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. या महोत्सवासाठी ‘ भारतीय स्पर्धागट’ विभागांतर्गत चित्रपट पाठविण्यासाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
२०१४ मध्ये मराठवाड्यातील चित्रपटकार, समीक्षक, कलाकार व सांस्कृतिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन’च्या वतीने, नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. भारत सरकारच्या सूचना एवं प्रसारण मंत्रालय, NFDF, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र रंगभूमी, चित्रपट व सांस्कृतिक विकास महामंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
पात्रता निकष:
- १ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान तयार झालेल्या किंवा १ सप्टेंबर २०२४ नंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रवेश देण्यात येईल.
- दिग्दर्शक व निर्माते भारतीय असणे आवश्यक. आंतरराष्ट्रीय सह-निर्मितीत एक निर्माता भारतीय असावा.
पुरस्कार:
- सुवर्ण कैलास सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट : स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व ₹ १,००,००० रोख रक्कम.
- रजत कैलास पुरस्कार (सर्वोत्तम अभिनेता, अभिनेत्री व पटकथा) : प्रत्येकी ₹ २५,००० रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र.
- काही निवडक चित्रपटांना फिप्रेसी पुरस्कारासाठी पात्रता मिळू शकते.
- सर्व चित्रपट प्रेक्षक निवड पुरस्कारासाठी पात्र असतील.
महत्त्वाचे आकर्षण:
- मराठवाड्यातील युवा दिग्दर्शक व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचे लघुपट सादरीकरण.
- ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञांसोबत मास्टरक्लासेस व संवाद सत्र.
- फिप्रेसी इंडिया चॅप्टरच्या सहकार्याने कार्यशाळा.
- पोस्टर प्रदर्शन, चर्चासत्रे
प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख:
- अर्ली बर्ड डेडलाईन : ३१ जुलै २०२५
- रेग्युलर डेडलाईन : ३१ ऑगस्ट २०२५
प्रवेशिकेसाठी अधिक माहिती व फॉर्म www.aifilmfest.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लिंक : https://aifilmfest.in/entry-form-aiff-2026 अधिक माहितीसाठी [email protected] या ईमेलवर संपर्क साधता येणार आहे.
चित्रपटप्रेमी, कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ही पर्वणी ठरणारा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव चित्रपट प्रदर्शनाचे नव्हे तर संवाद, ज्ञानवर्धन आणि सांस्कृतिक समृद्धीचे व्यासपीठ आहे.
संपर्क:
अमित : ९९७०४ ६८२४९
किशोर : ९८९०५ ४००८८