Monday, January 30, 2023

Mutual Funds मध्ये investment करून 15 वर्षात मिळू शकतील 2 कोटी रुपये ? त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक बर्‍याचदा फायनान्शिअल एक्सपर्टसना म्युच्युअल फंड मधून करोड़पति होण्यासाठीचा प्रश्न विचारतात. यावर, या एक्सपर्टसचे उत्तर हो असे असते पण अटींसह. ते म्हणतात की इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये थोड्या थोड्या पैशांची गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवायचा हा एक उत्तम मार्ग आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ मुदतीसाठी मोठे रिटर्न देण्याची क्षमता असते. त्यांनी महागाईवर मात करून टॅक्सनंतर चांगले उत्पन्न दिले. मात्र असे रिटर्न मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी सतत गुंतवणूक करण्याची गरज आहे. मग बाजाराची परिस्थिती काहीही असु देत.

25 टक्के रिटर्न – मॉर्निंगस्टार इंडियाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, सर्व इक्विटी स्कीम श्रेणी, इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस), मिड-कॅप, लार्ज आणि मिडकॅप, लार्ज-कॅप, स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि मल्टी-कॅपने 25 मार्च ते 3 जून या कालावधीत 23 ते 25 टक्के रिटर्न दिला आहे.

- Advertisement -

लार्ज कॅप फंडाने सर्वाधिक रिटर्न दिला. या निधीतून 25.1 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्यात आलेला आहे. मल्टी कॅपने 25 टक्के, ईएलएसएस आणि लार्ज-कॅप फंडांनी 24.9-24.9 टक्के, स्मॉल-कॅप 24 टक्के आणि मिड-कॅपने 23.2 टक्के दिले. या काळात बाजारात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

15 वर्षात 2 कोटी रुपये कसे मिळवायचे – एक्सपर्ट्सनी सांगितले की जर आपण म्युच्युअल फंडात 12 % वार्षिक रिटर्न विचारात घेतला तर 15 वर्षात 2 कोटी रुपये उभे करण्यासाठी तुम्हाला दरमहा सुमारे 39,650 रुपये गुंतवावे लागतील. आपल्याकडे जर इतका पैसा नसेल तर आपल्याकडे जेवढे असतील त्याने ताबडतोब गुंतवणूक करण्यास सुरूवाट करावी. आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपल्या पगारासह गुंतवणूकीचे प्रमाण वाढवावे.

म्युच्युअल फंडस का चांगले आहेत – म्युच्युअल फंडाचे एक्सपर्ट्स म्हणतात की गुंतवणूकीद्वारे पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग एसआयपी आहे. या एसआयपी अर्थात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून त्यात थोडेसे पैसे गुंतवून मोठा फंड मिळू शकतो. एक्सपर्ट्सचे मत असे आहे की, जरी बाजार घसरत असेल तरी एसआयपीमधून बाहेर पडायला घाई करू नका कारण गुंतवणूकदारांना वाढत्या बाजारात स्वस्त झालेल्या युनिटचा फायदा मिळतो.

इक्विटी म्युच्युअल फंडाचा प्रश्न आहे की, जे गुंतवणूकदार जास्त जोखीम घेऊ शकतात, त्यांनी यामद्ये जास्त गुंतवणूक करावी. मात्र, इक्विटी म्युच्युअल फंडातील लार्ज कॅप फंड गुंतवणूकदारांच्या आवडीचे राहिले आहेत कारण ते बर्‍याच वेळा त्यांच्या विश्वासावर खरे ठरले आहेत.

म्युच्युअल फंडासंबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे
म्युच्युअल फंड स्कीम मध्ये घट झाल्यास माझ्या सर्व पैशाचे नुकसान होईल काय? शेअर बाजाराशी जोडल्या गेल्याने म्युच्युअल फंडामध्ये धोका कायम राहतो आणि म्हणून गुंतविलेली मूळ रक्कम गमावली जाऊ शकते. मात्र, म्युच्युअल फंडाची कामगिरी पाहता असे म्हटले जाऊ शकते की आपण आपले सर्व पैसे गमावण्याची शक्यता जरा कमीच आहे.

मी किती पैसे देऊन सुरुवात करू शकेन? आपण दरमहा किमान 500 रुपयांच्या एसआयपीसह सुरुवात करू शकता.

मी म्युच्युअल फंड कधीही विकू शकतो? बहुतेक म्युच्युअल फंड हे ओपन एन्ड असतात, म्हणजेच आपण ते कधीही विकू शकता. क्लोज-एन्ड स्कीममध्ये साधारणत: 3-4 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. आणखी एक प्रकारची स्कीम आहे ज्यात, म्युच्युअल फंड हे काही काळ लॉक-इन केले जाते, मात्र यानंतर हे ओपन एंडेड होतात. उदाहरणार्थ, टॅक्स सेविंग किंवा ELSSचा लॉक-इन कालावधी हा 3 वर्षांचा आहे. या कालावधीनंतर आपण कधीही या फंडांची विक्री करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.