औरंगाबाद : बेकायदेशीररित्या प्रतिबंधित गांज्याची विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हेशाखेच्या पथकाने छापा मारून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीचा गांजा पोलीसांनि जप्त केला आहे. ही कारवाई उस्मानपुरा भागात करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. मुराद खान महेबूब खान वय-22 (रा.अशुर खाना समोर उस्मानपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, उस्मानपुरा भागात एक जण अवैधरित्या गांजा विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना मिळाली होती. या माहिती वरून साह्ययक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक धोंडे, सय्यद अली, नंदकुमार जैन, गजानन मांटे आदींच्या पथकाने उस्मानपुरा भागातील मुरादखान याच्या गांजा विक्रीच्या ठिकाणावर छापा मारला असता तेथे मुराद हा गांजा विक्री करीत असल्याचे आढळला.
पोलिसांनी त्यास ताब्यात घेत झडती घेतली असता त्या जवळ तीन किलो 50 ग्राम गांजा आढळून आला. या प्रकरणी एन.डी.पी.एस. ऍक्टनुसार उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.