IPL बेटींगवरून दोन गटात तुफान हाणामारी : प्रकार CCTV कॅमेर्‍यात कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । मिरज येथे दोन गटात मारामारी झाली आहे. काठ्या राॅडच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. समीर मुल्ला असं जखमी झालेल्याचं नाव आहे. कैफ पठाण, अश्रफ पठाण आणि त्याच्या 5 साथीदारांनी मारहाण केल्याची तक्रार समीर मुल्ला याने पोलिसांत केली आहे. मारामारीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाला आहे.

मिरजेत आयपीएलवर जोरदार बेटिंग सुरु बुकींनी मोबाइल बेटिंग ऍप सुरु केले आहे. ऍपवर बेटिंगसाठी मटक्याप्रमाणे एजंट नेमण्यात आले आहेत. गेले महिनाभर क्रिकेट सट्टाबाजारात कोट्यवधीची उलाढाल सुरु आहे. एका बेटिंग बुकीच्या एजंटाला शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन समीर मुल्ला या एजंटास काठ्या व रॉडने बेदम मारहाण करण्यांत आली.

कैफ पठाण, अश्रफ पठाण व त्याच्या 5 साथीदारांनी मारहाण केल्याची तक्रार समीर मुल्ला याने पोलिसांत केली आहे. पठाण यानेही समीर मुल्ला याच्याविरुद्ध बेटिंगच्या वादातून मारहाणीची तक्रार केली आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावर बेटिंग वादातून एजंटात मारामारीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत रात्र उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. प्रकरण मिटविण्यासाठी काही बेटिंग बुकींचे प्रयत्न सुरु होते.

Leave a Comment