वाळवंडा येथे कार आणि बाईकचा भीषण अपघात ! 2 जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात (accident) घडला आहे. विक्रमगडहुन जव्हारकडे जाताना कार आणि बाईक यांच्यात भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघात गुरुवारी सांयकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास घडला. भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी वाहनाने बाईकला जोरदार धडक दिली. हि धडक (accident) एवढी भीषण होती कि बाईकवरून निघालेल्या दोघांचा जागीचं मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातग्रस्त भागाची पाहणी केली. हा अपघात (accident) नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी
दीपक तुंबडा आणि संदेश ओझरे असे या अपघातामध्ये (accident) मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहेत. तर योगेश कुवरा हा तरुण गंभीर जखमी आहे. तो सध्या कोमात असून त्याच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी इतका जोरात आवाज आला की, घटनास्थळी असणारे लोकसुद्धा घाबरले होते. या अपघातानंतर (accident) त्या ठिकणी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती.

कारची तिघांना जोराची टक्कर
अपघातामध्ये (accident) मृत्यू झालेल्या दोघांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी तिथल्या शासकीय रुग्णालयात देण्यात आले आहे. मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच या अपघातामध्ये (accident) जखमी झालेला तरुण कोमात असून त्याच्यावर सध्या नाशिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भरधाव वेगाने निघालेल्या कारने तिघांना जोराची टक्कर दिल्याची माहिती तिथल्या ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment