Saturday, February 4, 2023

जिल्हा रुग्णालयातील राडा तृतीयपंथींच्या अंगलट, शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

डॉक्टरांनी कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवा, म्हटल्याच्या कारणावरुन चिडून तृतीयपंथींनी बुधवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला होता. तसेच संबंधित डॉ. पोळ यांना पाया पडायला भाग पाडले. हा प्रकार तृतीयपंथींच्या अंगलट आला असून, 6 तृतीयपंथींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बुधवारी दुपारी बारा वाजता उपचारासाठी आलेल्या तृतीयपंथीला डॉ. पोळ यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले. त्याचा राग मनात ठेवून संग्राम संस्थेच्या आर्या पुजारी, हिना पवार यांच्यासह 6 जणांनी डॉ. पोळ यांच्या ओपीडीमध्ये शिरुन त्यांना मारहाण करत वैद्यकीय साहित्याची मोडतोड केली.

तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या केबीनमध्ये शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात भा.द.वि.स. 353, 323, 504, 506, 143, 147, 149 वैद्यकीय अधिकारी नियम 2010 कलम 4 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे तपास करत आहेत. सातारा शहर पोलीस या गुह्यातील तृतीयपंथींना लवकरच अटक करणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.