विमा पॉलिसीच्या कॅशलेस नेटवर्कमधील रुग्णालय जर पॉलिसी नाकारत असेल तर इथे करू शकता तक्रार; जाणून घ्या याबाबत माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनची परिस्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. यामध्ये रुग्णालयात ऍडमिट केल्यानंतर रुग्णालयाची फी मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. यामुळे त्यावेळी विमा खूप उपयोगी पडतो. त्यामुळे विमाधारक रुग्णांना विमा सूचीमध्ये असणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना कॅशलेसची सुविधा मिळते. यामुळे त्यांच्यावर अचानक आर्थिक ताण पडत नाही.

आपल्या विम्याचे कव्हर कुठल्या-कुठल्या गोष्टींना आहेत यावर हॉस्पिटलमधील चार्ज अवलंबून असतो. हॉस्पिटलमधील भरतीच्या वेळी अशा गोष्टींना खर्च द्यावा लागतो, ज्या गोष्टी यामध्ये सामील नाहीत. रजिस्ट्रेशन खर्च, डिस्चार्ज आणि ॲम्बुलन्सचा खर्च रुग्णांना खिशातून करावा लागतो. जर तुम्ही आरोग्य विमा घेतला आहे आणि तुम्ही उपचार करत असलेल्या रुग्णालयांमध्ये कंपनीच्या नेटवर्कचा भाग नसेल आणि तुमची पॉलिसी नोन कॅशलेस क्लेम पॉलिसी असेल तर तुम्ही विम्यासाठी नंतर प्रयत्न करू शकता. यासाठी रुग्णाला रुग्णाला त्याचे बिल जमा करावे लागेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सूचनेनुसार आयआरडीएआयने सर्व नेटवर्क हॉस्पिटलसनी करून रुग्णांना उपचारासाठी कॅशलेस ट्रीटमेंट उपलब्ध करावी असे सक्त आदेश दिले आहेत. या आदेशानंतर नेटवर्क हॉस्पिटल्स कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यास नकार देत असतील तर, ग्राहक संबंधित विमा कंपनीकडे तक्रार करू शकतात. असे आयआरडीएआयने सांगितले आहे. यासाठी तक्रार निवारण अधिकाऱ्यांचीही मदत घेता येणार आहे.

 

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment