गंभीर आजारांच्या उपचारासाठी मिळणार आर्थिक मदत; फक्त या नंबरवर करा कॉल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारकडून नागरिकांसाठी एक भन्नाट अशी योजना आखण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करण्याची गरज आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तुम्हाला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सरकार मदत करेल. तसेच वीस गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी सरकारकडून तुम्हाला पंचवीस हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाईल. ८६५०५६७५६७ या नंबरवर फोन केल्या नंतर लहान बालकांवर मोफत शस्त्रक्रियेची सोय राज्य सरकार देईल. चला मग ही सेवा काय आहे याबाबत जाणून घेऊ.

८६५०५६७५६७ हा नंबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा आहे. या नंबर वर तुम्ही फोन केल्यानंतर काही वेळातच तुम्हाला एक मेसेज येतो. या मेसेजमध्ये तुम्हाला वैद्यकीय मदतीसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतात किती मदत मिळते या अंतर्गत किती व कोणते आजार आहेत याची संपूर्ण यादी देण्यात येते. तुम्ही अर्ज केल्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्र्या वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार, संबंधित रुग्णाला अर्थसाहाय्य केले जाते. मागील एक दीड वर्षात राज्यातील असंख्य गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमार्फत मदत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना

– राज्य सरकार राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वयोगटातील रुग्णाना मोफत उपचार देते..

– यासोबत, cmrf.maharashtra.gov.in संकेतस्थळावर मिळेल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतील रुग्णालयांची माहिती देण्यात आली आहे.

– या योजनेमार्फत वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार २५ हजार ते दोन लाखांपर्यंत रुग्णांना करण्यात येते.

– यासाठी फक्त, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, रुग्णाचे आधारकार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, आजाराचे रिपोर्ट, प्रत्यारोपण रुग्णासाठी शासकीय समितीची मान्यता असलेले प्रमाणपत्र, अशा कागदपत्रांची आवश्यकता लागते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना योजनेमार्फत वीस गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी सरकारकडून मदत करण्यात जाते. महात्मा फुले जनआरोग्य योजना, चॅरिटी हॉस्पिटल व राष्ट्रीय बाल स्वास्थमधून उपचार न मिळाल्यास अशा रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आधार दिला जातो. या योजनेअंतर्गत, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग अशा 20 आजारांवर उपचार सेवा पुरवली जाते.