व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

CBSE , ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता राज्यात इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र आता बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्यात त्या पार्श्वभूमीवर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात यावा या मागणीसाठी वकील ममता शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्‍नावरून पालकांमध्ये देखील चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. काही माध्यमांमधून बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याचे मेसेज व्हायरल होत होते मात्र सीबीएसई बोर्डाने मात्र बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. बारावीच्या परीक्षा रद्द करण्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. बारावीच्या परीक्षा रद्द केल्या जातील या सर्व अफवा आहे तसंच सीबीएसई बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात शुक्रवारी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले. बारावीच्या परीक्षांबाबत जो निर्णय घेतला जाईल तो माध्यमांना अधिकृतरित्या कळवण्यात येईल असंही सीबीएसई ने म्हंटले आहे. दरम्यान सीबीएसई बोर्डामध्ये विद्यार्थ्यांना अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांच्या संबंधीत माहिती अधिकृत वेबसाईटवर जाहीर करते. अपडेटेड माहिती साठी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आला आहे.