CBSE 12 वी निकालाचा फॉर्म्यूला ठरला, जाणून घ्या नवा फॉर्म्यूला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन रद्द करण्यात आल्या होत्या. CBSE 12 वी परीक्षेच्या संदर्भात निकाल प्रकरणी नियुक्त केलेल्या तेरा सदस्य समितीने गुरुवारी आपला अहवाल सादर केला आहे. या समितीने बारावीच्या गुणपत्रिका तयार करण्यावर अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये खालील निकष निकालासाठी लावण्यात आले आहेत.

समितीनुसार या निकषांवर बारावीचा निकाल

— बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी 30:30:40 फॉर्मुला च्या बाजूने समिती आहे.
— दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालाचे 30% वेटेज,इयत्ता बारावी च्या पूर्व बोर्ड परीक्षेचे 40 टक्के वेटेज दिले जाईल हे निकालाचं सूत्र असणार आहे.
— दहावीच्या 5 विषयांपैकी तीन विषयांचे उत्कृष्ट गुण घेतले जातील.
— अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण घेतले जातील.
–बारावी पूर्व बोर्ड परीक्षा आणि प्रॅक्‍टिकल असे गुण घेतले जातील.
— दहावीचे 30 टक्के गुण अकरावीच्या गुणांपैकी 30 टक्के आणि बारावीच्या 40 टक्के गुणांवर आधारित निकाल लावण्यात येईल.

याबाबत सीबीएसई ने स्पष्ट केलं की बारावीचा अंतिम निकालात दहावी अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डाच्या निकालाच्या आधारावर तयार केला जाईल. तसेच ज्या मुलांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. येत्या 31 जुलैला हा निकाल जाहीर होईल असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment