तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा; बर्थडे बॉयला अटक

औरंगाबाद – शहरात सध्या शस्त्रबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे कोणत्यही प्रकारचे शस्त्र बाळगता येत नाही. अशातच तलवारीने केक कापून बर्थडे सेलिब्रेट करणं तरुणाच्या अंगलट आले आहे. पोलिसांनी बर्थडे बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. तलवारीने केक कटिंग करतानाचा व्हिडीओ तरुणाने स्टेटसवर ठेवला होता.

याविषयी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील जुना मोंढा परिसरात बावीस इंची धारदार तलवार घेऊन हर्षद रोहिदास गोरमे या आरोपीने वाढदिवसाचा केक कापला होता. हर्षदने याचा व्हिडिओ स्टेटसवर ठेवला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

या प्रकरणी शस्त्रबंदी कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तलवारीने केक कापून त्याचे स्टेटस ठेवल्यामुळे परिसरात खळबळ पसरली होती.

You might also like