कोरोना प्रकोप! देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 डिसेंबरपर्यंत केंद्रानं घातली बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्लीसह देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप काढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवांच्या उड्डाणांवर पुन्हा बंदी घातली आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही बंदी असणार असून डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)ने त्याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.

डीजीसीएच्या या आदेशनानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्या आणि परदेशातून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांचं उड्डाण होणार नाही. मात्र, डीजीसीएचा हा आदेश इंटरनॅशनल ऑल कार्गो ऑपरेशनला लागू राहणार नाही. तसेच ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत येणाऱ्या विमान सेवाही सुरू राहणार आहेत. या आदेशानुसार काही निवडक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय शेड्यूल फ्लाइट्सच्या उड्डाणांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

कोरोना काळात ज्या सेक्टरचं सर्वाधिक नुकसान झालं. त्यात एव्हिएशनचाही समावेश आहे. दीर्घकाळ विमानसेवा बंद राहिल्याने या सेक्टरचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू करून 70 टक्के क्षमतेने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती.

देशात 25 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याआधी 23 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. ही बंदी 29 मार्चपर्यंत होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढल्याने लॉकडाऊनचा कालावधीही सहा महिन्यावर गेला. त्यामुळे विमानांच्या उड्डाणालाही बंदी घालण्यात आली होती. (International flight ban extended till Dec 31)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment