Tuesday, February 7, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय, २२ मार्चपासून परदेशी विमानांच्या लँडिंगवर घातली बंदी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोना व्हायरसमुळे मृत्यूची संख्या ४ झाली आहे. तसेच संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून १७७ झाली आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९ झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वात जास्त संख्या परदेश दौरा करून भारतात परतलेल्यांची आहे. केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेत २२ मार्चपासून परदेशातून भारतात येत असलेल्या सर्व प्रवासी विमानांच्या लँडिंगवर आठवडाभरासाठी बंदी घातली आहे.

केंद्र सरकाने याबाबत एक परिपत्रक जारी केलं असून यात परदेशातून भारतात येत असलेल्या सर्व प्रवासी विमानांच्या लँडिंगवर बंदी घालण्यात आल्याचं नमूद केलं आहे. तसेच राज्य सरकारांना ६५ वर्षांवरील वयोवृद्ध व्यक्तींनी घरी राहण्यासाठी सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना घरी राहण्यास सरकारने सांगितले आहे. त्यांना घर सोडण्यास मनाई आहे. तसेच रेल्वे, विमान वाहतूक कंपन्यांना विद्यार्थी, रूग्ण आणि अपंग वगळता सर्व नागरिकांच्या तिकिटांवरील सूट बंद करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात यावी. गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क च्या कर्मचार्‍यांना पर्यायी आठवड्यात कार्यालयात येण्यास या परिपत्रकात सांगितले आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.